प्रतिनिधी/ बेळगाव
प्रसिद्ध रंगभूमी कलाकार एणगी बाळाप्पा यांच्या नावे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारवर दडपण आणावे, अशी मागणी बेळगाव येथील साहित्यिकांनी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याकडे केली आहे.
शनिवारी प्रा. बी. एस. गवीमठ, डॉ. बसवराज जगजंपी, डॉ. गुरुदेवी हुलप्पन्नवरमठ, सुभाष एणगी, भागोजी, सिद्धू व अशोक आदींनी इराण्णा कडाडी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला. बेळगावात रंगभूमीविषयी कार्यक्रम सातत्याने व्हावे यासाठी रंगभीष्म एणगी बाळाप्पा यांच्या नावे ट्रस्ट स्थापन करून या ट्रस्टच्या माध्यमातून नाटय़परंपरा जोपासण्याची मागणी करण्यात आली आहे. खा. इराण्णा कडाडी यांनी यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याची मागणी करण्यात आली आहे