प्रतिनिधी/ बेळगाव
मानव हक्क दिनानिमित्त जेएनएमसीमध्ये ‘एनआयआर मॅरेजीस’ या विषयावर राष्ट्रीय आयोगाच्या सहकार्याने वेबिनार घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. ए. कोठीवाले उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी आपला जोडीदार निवडताना काळजी घ्या. येत्या काळात लिंग समानता हा मोठा मुद्दा ठरणार आहे. लग्न म्हणजे स्वीकृती आणि तडजोड यांचा समन्वय आहे.
कॉलेजच्या प्राचार्या डॉ. एन. एस. पट्टणशेट्टी यांनी लग्नगाठी जरी स्वर्गात बांधल्या गेल्या असल्या तरी वास्तव हे भूतलावरच असते. अनेक सुशिक्षितांनासुद्धा विवाह संबंधाच्या कायद्याची माहिती नसते. अशा वेबिनारमधून ती सर्वांपर्यंत पोहोचू शकते.
प्रारंभी उपप्राचार्य डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी यांनी स्वागत केले. यानंतरच्या चर्चासत्रात डॉ. ज्योती हिरेमठ, डॉ. मोहन मावीनकट्टी, डॉ. सरसू थॉमस, डॉ. सुदेश बडामट यांनी विषयाच्या अनुषंगाने सामाजिक, कायदेशीर आणि मानसिक पैलुंचा आढावा घेतला.