नवी दिल्ली
नीलाचल पोलाद निगम लिमिटेडचे (एनआयएनएल) अधिग्रहण चालू तिमाहीच्या अंतिमक्षणापर्यंत पूर्ण होणार असल्याचे टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक टी.व्ही.नरेंद्रन यांनी सांगितले आहे.
टाटा स्टीलसाठी एनआयएनएलचे हे अधिग्रहण उत्पादन वाढीच्या कार्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. नरेंद्रन यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे, की सदरचे अधिग्रहण हे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पूर्ण करण्यात येणार असून आगामी काळात या योगे आम्ही आमच्या व्यवसाय विस्ताराला अधिक चालना देणार आहोत. टाटा स्टीलने 31 जानेवारी रोजी ओडिसाची पोलाद निर्मिती कंपनी एनआयएनएलची 12,100 कोटी रुपयांमध्ये 93.71 टक्क्यांच्या हिस्सेदारीसह खरेदी करण्यासाठी बोली जिंकली होती.