वादाच्या प्रसंगी नव्या अधिकाऱयांसमोर राहणार कसोटीचा काळ
वृत्तसंस्था/ मुंबई
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) ने नवीन कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या पदाकरीता येत्या 25 मार्च 2022 पर्यंत संबंधीत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती आहे.
साधारणपणे सध्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असणारे विक्रम लिमये यांचा कार्यकाळ हा जून महिन्यात समाप्त होत आहे. या पदावर लिमये यांना पुन्हा नियुक्त व्हायचे असल्यास ते पुन्हा अर्ज करु शकतात. लिमये हे जुलै 2017 रोजी नियुक्त झाले होते. त्यावेळी एक्सचेंजमध्ये सह लोकेशनची पडताळणी सुरु होती आणि चित्रा रामकृष्णा यांचे लग्न झाले होते. यानंतर लियमे या पदावर नियुक्त झाले होते. मात्र यामुळे खुप काही परिस्थिती बदलली नाही, असे समजते.
लिमये यांच्या येण्याअगोदरपासून वाद
अधिकारी लिमये यांच्या कार्यकाळा अगोदरपासून एनएसई समस्यांमध्ये होता, तीच स्थिती आजही असल्याचे दिसून येत आहे. तेव्हापासून आतापर्यंत एक्सचेंजवर सेबीने दंड आकारणी केली आहे. आधीपासून वाद सुरू आहे.
उमेदवाराकडे काय असावे ?
संबंधीत उमदेवाराकडे कॉर्पोरेट गव्हर्नर, एन्टरप्राईजेस रिस्क मॅनेजमेंट आणि कंप्लायंस मॅनेजमेंट बाबतच्या अनुभवाची शिदोरी असावी. तसेच पब्लिक लिस्टेड कंपनीचा अनुभव असणे आवश्यक असून एक्सचेंजसाठी आयपीओ प्रक्रिया पूर्णपणे हाताळणाऱया उमदेवारांची गरज आहे. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने 6 वर्षांपासून इश्यू आणण्याचा प्रयत्न केला असून तो अद्यापही पूर्ण झाला नाही. तेव्हा वरील अनुभवाच्या उमेदवारांना संधी असेल.