प्रतिनिधी /पणजी
परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी गोवा विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन करणाऱया एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांना पोलासंनी ताब्यात घेतले. एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांनी विद्यापिठाच्या आवारात घोषणाबाजी करीत कुल सचिवांना भेटण्याची मागणी केली होती. भेटण्यासाठी अनुमती नसल्याने पोलिसांना त्यांना आत जाण्यास मनाई केली होती. जबरदस्तीने कुलसचिवांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याब्यात घेतले. पोलासंनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्यामध्ये नौशाद चौधरी, मौलानी इजदार वसमिर सावंत (तिघेही म्हापसा येथील आहेत) यांचा समावेश आहे. नंतर त्यांना ताकीत देऊन सोडण्यात आले.