हैदराबाद / वृत्तसंस्था
तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) संस्थापक आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची कन्या उमा माहेश्वरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह हैदराबाद येथील घरात लटकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. त्या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
एनटीआर यांना एकूण 12 मुले होती. यामध्ये आठ मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे. उमा माहेश्वरी या चार बहिणींमध्ये सर्वात लहान होत्या. अलीकडेच उमा माहेश्वरी यांच्या मुलीचा विवाह समारंभ पार पडला होता. या सोहळय़ाला कुटुंबातील बहुतांश सदस्य उपस्थित होते. एनटीआर यांचे तीन पुत्र यापूर्वीच दिवंगत झाले आहेत.