ऑक्टोबर 2022 मध्ये शेअर बाजारात सुचीबद्ध करणार
नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी एनटीपीसीने आपल्या स्वच्छ ऊर्जा शाखा एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (एनआरईएल) ला ऑक्टोबर 2022 मध्ये शेअर बाजारात सुचीबद्ध करण्यासाठी एक योजना आखली असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्व प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.
एनटीपीसी आगामी तीन वर्षात एकूण 15,000 कोटी रुपयाची पूनर्गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचे समजते. त्याची तयारी कंपनी करते आहे.