वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी एनटीपीसीचे वीज उत्पादन जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 13.3 टक्क्मयांनी वाढ होत 77.92 अब्ज युनिटवर पोहोचले आहे. यामध्ये एनटीपीसीच्या संयुक्त उद्योग आणि अन्य उत्पादनांचाही समावेश आहे.
कंपनीच्या विस्तारीत उद्योगासह एनटीपीसी समूहाच्या कंपन्यांच्या वीज उत्पादनाने चालू वित्त वर्षातील दुसऱया तिमाहीत मागील वित्त वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरच्या तुलनेत 13.3 टक्क्मयांनी वाढ नोंदवली आहे. चालू वित्त वर्षातील पहिल्या सहामाहीत एनटीपीसी समूहाचे वीज उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत समान कालावधीत 0.4 टक्क्मयांच्या वाढीसह 145.87 अब्ज युनिटवर पोहोचलंय. एनटीपीसीची एकूण स्थापित क्षमता 62.9 गीगावॅट आहे. एनटीपीसीची 70 वीज स्टेशन्स आहेत. यामध्ये 24 कोळसा आणि 13 अक्षय ऊर्जा यांचा समावेश आहे.