ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या आज दुपारपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने 126 जागांवर आघाडी घेतली आहे.
एनडीएमध्ये भाजप 76, जेडीयूला 41 तर VIP 05 आणि HAM ला 3 जागेवर आघाडी मिळाली आहे. महाआघाडीने 108 जागांवर आघाडी घेतली आहे. राजद 71, काँग्रेस 20 आणि इतर पक्षांनी 18 जागांवर आघाडी घेतली आहे. बसपाला 2 जागांवर, एमआयएमला 2 जागांवर तर एलजेपी आणि इतर यांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.
एनडीए आघाडीवर असली तरी देखील ही लढत अटीतटीची असल्याचे दिसून येते. त्यामुळे अखेरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.