डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिटÎूटचा कॅडेट रोनित नायक याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एन. डी. ए. परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाने स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आर्मी ऑफिसर क्षेत्रातही करिअर करावे, असे आवाहन डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी केले आहे.
ए. एफ. पी. आय. चे संचालक मेजर चंद्रसेन कुलथे म्हणाले, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल सहावीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना एन. डी. ए. परीक्षेविषयी गोडी निर्माण करण्याचे काम करते. नववीपासून प्रशिक्षण देण्यास सुरूवात होते. परंतू अकरावीला मात्र पूर्णपणे प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना तयार केले जाते. स्कूलच्या स्थापनेपासून जवळपास पाच विद्यार्थी एनडीएमध्ये गेले आहेत. यंदाही रोनित नायक देशात प्रथम, पंकेश महाले देशात बारावा, गौरव नाथ देशात एकोनव्वदावा दिले जाते. चंदन हरले देशात एकशे पंधरावा, पवन निर्मल देशात एकशे पंचाहत्तररावा क्रमांक पटकावला आहे. एनडीए परीक्षेचा सराव करण्यासाठी दर महिन्याला सराव परीक्षा घेतली जाते.
यातूनच विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख वाढला आहे. नायर याने देशात पहिला क्रमांक मिळवून इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच शाळेचे नाव ही देशपातळीवर उंचावले आहे. एका ग्रामीण भागातील स्कूचा विद्यार्थी देशात प्रथम येतो यातच आमच्या शाळेचे यश दडले आहे. स्कूलच्या वतीने रोनित नायक याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी स्कूलचे संचालक संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्य मारूती कामत, ए. एफ. पी. आय. चे चेअरमन विश्वास कदम, आदी उपस्थित होते.
यशस्वी होण्यासाठी जिद्द असण्याची गरज
मी लहानपणापासूनच एनडीएमध्ये जाण्याचे ठरवले होते. माझे वडील नेव्हीमध्ये असूनही पेठवडगाव डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमधील प्रशिक्षक आणि शिक्षण पाहून मी हे स्कूल निवडले. जिद्द, चिकाटी, तीव्र इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमामुळेच आपले ध्येय गाठता येते. लेखी परीक्षा, फिजीकल टेस्ट, मुलाखत आणि तुमची मानसिकता कशी आहे याचीदेखील तपासणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवड असेल तर त्यांना काहीच अशक्य नाही. लक्ष केंद्रीत करून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. माझे पुण्यातील ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर मी आर्मी ऑफिसर म्हणून रूजू होणार आहे. -रोनित नायक (एनडीए परीक्षेत देशात प्रथम)