प्रतिनिधी /बेळगाव
जाधवनगर येथील एनसीसी मुख्यालय येथे एक भारत श्रेष्ट भारत या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती व समृद्ध वारसा विद्यार्थ्यांना समजावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गोवा, उत्तर प्रदेश व कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक प्रकार सादर केले.
डॉ. दिलीप नाईक यांनी भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार व कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक राज्यातील कॅडेटने आपली संस्कृती, भाषा या विषयीची माहिती दिली. या कार्यक्रमाला ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास, डॉ. एस. एम. देशपांडे, कर्नल आर. खजुरिया, कर्नल ए. के. वर्मा, फ्लाईंग लेफ्टनंट आर. टी. कटांबळे, स्नेहा पाटील, एल. टी. कुरानी, अमित चिंगळे, मोनिका फर्नांडिस यासह इतर उपस्थित होते.