बेळगाव : बेळगाव येथील एनसीसी मुख्यालयातर्फे दि. 7 एप्रिलपासून पर्मनंट इन्स्ट्रक्टर ओरिएन्टेशन कोर्सला (पीआयओसी) प्रारंभ झाला आहे. कर्नाटक आणि गोवा संचालनालयातर्फे लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये प्रशिक्षकांसाठी या कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव मुख्यालयाचे ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास यांच्या हस्ते कोर्सचे उद्घाटन झाले. या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभ घ्या आणि एनसीसी छात्रांना प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
एनसीसी छात्रांना कोणत्या पद्धतीचे प्रशिक्षण द्यावे, याची माहिती प्रात्यक्षिकांसह या प्रशिक्षणातून देण्यात येणार आहे. ड्रील, मॅप रीडिंग, थलसैनिक, वेपन टेनिंग व प्रजासत्ताक दिनादिवशी होणारे पथसंचलन आणि एनसीसीच्या बी-सी प्रमाणपत्र परीक्षा याबाबतही प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दि. 16 एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.