प्रतिनिधी /बेळगाव
जाधवनगर येथील एनसीसी कार्यालयामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांच्या ट्रेकचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. 14 ते 21 डिसेंबरदरम्यान झालेल्या या ट्रेकअंतर्गत छात्रांनी प्रति÷sच्या कमांडो स्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी साप हाताळणे, लिडो जंप, कमांडो स्लाईड व अन्य प्रात्यक्षिके पाहिली. त्यानंतर स्वतःही प्रयोग करून पाहिला.
छात्रांनी मराठा लाईट इन्फंट्री ट्रेनिंगला भेट दिली व येथील प्रशिक्षणाची पद्धत जाणून घेतली. या शिवाय मराठा म्युझियमलाही त्यांनी भेट दिली. या ट्रेकमध्ये एनसीसीच्या 7 संचालनालयाच्या 400 हून अधिक छात्रांनी सहभाग घेतला. या दरम्यान छात्रांसाठी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. सांगता समारंभामध्ये ट्रेकचे व्यवस्थापक कर्नल के. श्रीनिवास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एनसीसीचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी कर्नल राजीव खाजुरीया, ग्रुप कॅप्टन यू. डी. पाटकर, कर्नल बी. पी. मिश्रा, लेफ्टनंट कर्नल सी. बी. नंदकुमार, सुभेदार मेजर निलेश देसाई, सुभेदार महादेव अवताडे, लेफ्टनंट अमित चिंगळी, निरीक्षक सुभाषचंद्र चिक्कपण्णावर उपस्थित होते. छात्र वेदांत ओमप्रकाश याने सूत्रसंचालन केले. लेफ्टनंट एम. एस. कुराणी यांनी आभार मानले.