ऑनलाईन टीम / मुंबई :
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. या दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निसीआरपीएफच्यारील स्फोटके आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती आहे. सीआरपीएफच्या आठ ते दहा कंपन्या इथे तैनात आहेत. या दरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे.
दरम्यान, शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना (शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे.
निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.