ऑनलाईन टीम/तरुण भारत
टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली आहे. टाटा समूहाने सोमवारी नटराजन चंद्रशेखरन हे एअर इंडियाचे अध्यक्ष असतील अशी घोषणा केली. टाटा सन्सच्या बोर्डाने सोमवारी देशांतर्गत विमान कंपनीचे पुढील अध्यक्ष म्हणून चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.
दरम्यान, एअर इंडियाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर एअर इंडिया आता कंपनीच्या सीईओ पदाच्या शोधात आहे. त्याचप्रमाणे जनरल इन्शूरन्स कॉर्पोरेशनचे माजी सीएमी एलिस गीवर्गीस वैद्यन आणि भारतीय यूनिलिव्हरचे चेअरमन संजीव मेहता यांचाही स्वतंत्र संचालक म्हणून बोर्डावर समावेश करण्यात आला आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले आणि जानेवारी 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासह विविध समूह ऑपरेटिंग कंपन्यांच्या मंडळाचे प्रमुख देखील आहेत. चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे प्रमुख असलेले पहिले गैर-पारशी आणि व्यावसायिक कार्यकारी आहेत.