ऑनलाईन टीम :
एआयएनआरसीचे नेते एन रंगास्वामी यांनी आज पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात एका संक्षिप्त कार्यक्रमात उपराज्यपाल तमिलीसाई सौंदर्यराजन यांनी रंगास्वामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी तमिळ भाषेतून ही शपथ घेतली.
रंगास्वामी चौथ्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, तेे पहिल्यांदाच एनडीए सरकारचे नेतृत्व करणार आहेत. ज्यामध्ये एआयएनआरसी आणि भाजपचा समावेश आहे.