चांगल्या प्रतीचा मोठा बटाटा 200 तर बियाणांसाठीचा 500 रुपयांनी वधारला
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
एपीएमसीमध्ये बुधवारच्या बाजारात कांदा दरात 1000 रुपयांची वाढ झाली तर सफेद कांद्याचे भाव स्थिर होते. बटाटा बाजारात चांगल्या प्रतीचा गोळा बटाटा 200 रुपये तर बियाणांसाठी वापरात येणारा बटाटा 500 रुपयांनी वधारला. शिवाय परराज्यातील इंदोर आणि आग्रा बटाटासुद्धा 100 रु. वाढला.
बुधवारी बाजारात 22 ट्रक कांदा आवक होती. यामध्ये 4 ट्रक कर्नाटकातील तर 18 ट्रक कांदा हा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा होता. जुना कांदा आवक मोठय़ा प्रमाणात तर नवीन कांदा तुरळक प्रमाणात आवक होती. शिवाय प्रदेशातून कांदा आवक 5 ट्रक इतकी होती. यामध्ये इजिप्तचा तीन ट्रक तर तुर्कीचा दोन ट्रक इतकी कांदा आवक होती.
कांद्याचे भाव
गोळी 4000 ते 4600
गुल्टा 4700 ते 5000
मध्यम 5100 ते 5400
गोळा 5500 ते 6500
सफेद 8500 ते 9000
इजिप्त 4200
तुर्कस्थान 4800
बेळगाव परिसरातील स्थानिक बटाटा आवक जवळजवळ संपुष्टात आली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत स्थानिक बटाटा संपण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळी लागवडीसाठी वापरात येणारा माध्यम प्रकारचा बटाटा आवक कमी झाली आहे. यामुळे त्याच भाव वधारले असल्याची माहिती व्यापारी प्रकाश पाटील यांनी दिली.
दीपावली सणानिमित्त परराज्यातील बटाटा आवकही कमी जाली याचा परिणाम बटाटा दरात 100 रुपयांची वाढ झाली असल्याचा माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली. बाजारात परराज्यातील बटाटा आवक 5 ट्रक इतकी होती. यामध्ये इंदोरचा बटाटा 4 ट्रक तर आग्रा बटाटा एक ट्रक आवक होती.
बटाटय़ाचे भाव
गोळी 1000 ते 1500
मध्यम 2500 ते 3700
गोळा 3800 ते 4200
इंदोर 3500 ते 4000
आग्रा 3200 ते 3600