रताळी दरात 400 रुपयांनी वाढ : पंजाब, हरियाणा, इंदूर, मध्यप्रदेश, दिल्ली येथून रताळय़ांना मोठी मागणी
वार्ताहर /अगसगे
बेळगाव एपीएमसीमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा दरात 200 रुपयांनी घट झाली असून रताळी दरात प्रतिक्विंटल 400 रुपयांनी वाढ झाली आहे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला दरात मात्र घट झाली आहे.
सध्या इंदूर, आग्रा आदी राज्यांमध्ये तसेच तळेगाव येथील नवीन बटाटा काढणीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्येदेखील नवीन कांदा काढणीला प्रारंभ झाला आहे. शनिवार-रविवार विकेंड कर्फ्यू राज्य सरकारने हटविल्याने शनिवारी मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटय़ाची आवक मोठय़ा प्रमाणात झाली होती. यामुळे कांदा, बटाटय़ाचा दर प्रति क्विंटल 200 रुपयांनी घसरला, अशी माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
तालुक्यासह परराज्यांतून भाजीपाल्याची आवक भाजी मार्केटमध्ये होत आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून 10 किलो भाजीपाल्याचा भाव मात्र स्थिर असल्याची माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.
सध्या तालुक्यामध्ये रताळी आवक जवळपास संपत आली आहे. यामुळे शनिवारी बाजारात रताळी आवक कमी होती. थंडीच्या कालावधीत पंजाब, हरियाणा, इंदूर, मध्यप्रदेश, दिल्ली आदी ठिकाणांहून बेळगाव रताळय़ांना जास्त मागणी असते. आवक कमी आणि मागणीत दुप्पट वाढ झाल्याने रताळी दरात प्रतिक्विंटल 400 रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
शनिवारी मार्केटयार्डमध्ये रताळय़ाची केवळ पाच हजार पिशव्या आवक तर इंदूरहून नवीन बटाटा 15 ट्रक, आग्राहून 3 ट्रक, तळेगावहून एक ट्रक तर कर्नाटक कांदा 10 ट्रक आणि महाराष्ट्र कांदा 60 ट्रक असा एकूण 70 ट्रक कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती अडत व्यापारी कल्लाप्पा गडकरी यांनी दिली.
महाराष्ट्र नवीन कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1500 ते 1800 रु.
- मीडियम.. 1800 ते 2300 रु.
- मोठवड…. 2300 ते 2600 रु.
- गोळा…… 2600 ते 2900 रु.
कर्नाटक कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 800 ते 1800 रु.
- मीडियम.. 1800 ते 2200 रु.
- मोठवड…. 2200 ते 2600 रु.
- गोळा…… 2600 ते 2800 रु.
बटाटा भाव प्रति क्विंटल
- इंदोर…… 1000 ते 1600 रु.
- आग्रा……. 800 ते 1200 रु.
- तळेगाव… 800 ते 1300 रु.
- जवारी….. 1800 ते 2700 रु.
- रताळी… 1700 ते 2500 रु
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी………………300 ते 500 रु.
- शेपू……………….300 ते 500 रु.
- पालक……………150 ते 300 रु.
- कांदापात………..100 ते 500 रु.
- घटप्रभा कोथिंबीर…..600 ते 700 रु.
- बेळगाव कोथिंबीर…..200 ते 300 रु.
- लाल भाजी……………300 ते 500 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची………………400 ते 600 रु.
- इंदोर ढबू मिरची………500 ते 550 रु.
- बिन्स……………………..300 ते 350 रु.
- कारली……………………350 ते 400 रु.
- दोडकी…………………….500 ते 600 रु.
- कोबी…………………….200 ते 280 रु.
- इंग्लिश गाजर…………..400 ते 450 रु.
- भेंडी………………………600 ते 700 रु.
- बिट……………………….250 ते 300 रु.
- जवारी काकडी…………200 ते 300 रु.
- पांढरी काकडी………….100 ते 180 रु.
- आले नवीन…………….200 ते 220 रु.
- आले जुने…………………300 ते 350 रु.
- मटार……………………….200 ते 500 रु.
- मिरची……………………..500 ते 600 रु.
- दुधी भोपळा डझन………100 ते 120 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विंटल..2500 ते 3000 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे………………350 ते 500 रु.