मागणी वाढूनही कांदा-बटाटासह इतर भाजीपाल्यांचे दरही स्थिर : मिरची दरात वाढ
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न समितीच्या बाजारपेठेत शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटा भाव स्थिर आहे. रताळय़ाचा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला आहे. तर भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यामध्ये मिरचीचा भाव वाढला आहे. टोमॅटो आणि भेंडीचा भाव कमी झाला आहे. व इतर भाजीपाल्यांचे भाव मात्र स्थिर आहेत.
बाजारात कांदा व बटाटय़ाची आवक स्थिर होती. मागणीदेखील तेवढीच असल्याने कांदा-बटाटय़ाचा भाव स्थिर आहे.
सध्या रताळय़ाची आवक जवळपास संपली आहे. आणखी पंधरा दिवसात रताळी आवक संपते. रताळय़ाला परराज्यामध्ये मागणी घटली आहे. यामुळे रताळय़ाचा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला आहे.
उन्हाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बेळगाव जवारी बटाटय़ामध्ये काही प्रमाणात अळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बटाटा खराब होत आहे. आवक देखील अल्प प्रमाणात दाखल झाली होती.
सध्या इंदोर बटाटा मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. या बटाटय़ाला कोकणपट्टा, गोवा, कारवार, रामदुर्ग, गोकाक, पाश्चापूर, सौंदत्ती, खानापूर, दांडेली, यरगट्टी, लोकापूर, जमखंडी, मुधोळ आदी ठिकाणामधून मागणी येत आहे. जवारी बटाटय़ाला मागणी कमी येत आहे.
शनिवारी इंदोर बटाटय़ाच्या 12 ट्रका, आग्रा बटाटा एक ट्रक, तळेगाव बटाटा एक ट्रक, जवारी बटाटय़ाच्या 180 पिशव्या आवक, रताळय़ाची 120 पिशव्या आवक, कर्नाटक कांदा एक ट्रक, महाराष्ट्र कांदा 60 ट्रक आवक झाली होती.
बाजारभाव
महाराष्ट्र कांदा प्रति क्विंटल
- गोळी………. 1500 ते 2000 रु.
- मीडियम…… 2500 ते 2800 रु.
- मोठवड……. 2800 ते 3200 रु.
- गोळा………. 3200 ते 3500 रु.
कर्नाटक कांदा प्रति क्विंटल
- गोळी………. 1000 ते 1500 रु.
- मीडियम…… 2000 ते 2500 रु.
- मोठवड……. 2500 ते 2800 रु.
- गोळा………. 2800 ते 3000 रु.
- जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी…………. 300 ते 400 रु.
- मीडियम…… 1000 ते 1500 रु.
- मोठवड……. 1600 ते 1800 रु.
- गोळा………. 1800 ते 2000 रु.
बटाटा भाव प्रति क्विंटल
- इंदोर………. 1500 ते 1800 रु.
- आग्रा………. 1000 ते 1200 रु.
- तळेगाव……. 1200 ते 1500 रु.
रताळी भाव प्रति क्विंटल
रताळी…….. 1500 ते 1800 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी…………… 400 ते 600 रु.
- शेपू……………. 400 ते 500 रु.
- पालक………… 150 ते 300 रु.
- कांदापात……… 200 ते 300 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 800 ते 900 रु.
- बेळगाव कोथिंबीर 400 ते 600 रु.
- लाल भाजी……. 400 ते 500 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची……. 550 ते 600 रु.
- इंदोर ढबू मिरची 500 ते 550 रु.
- बिन्स………….. 200 ते 250 रु.
- कारली………… 500 ते 600 रु.
- पांढरी काकडी…. 150 ते 200 रु.
- दोडकी………… 350 ते 400 रु.
- कोबी…………… 80 ते 120 रु.
- इंग्लिश गाजर…. 300 ते 380 रु.
- भेंडी…………… 250 ते 300 रु.
- बिट…………… 200 ते 280 रु.
- जवारी काकडी… 250 ते 350 रु.
- आले नवीन……. 200 ते 220 रु.
- मटार…………. 350 ते 450 रु.
- मिरची………… 500 ते 700 रु.
- दुधी भोपळा डझन 100 ते 150 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे 100 ते 350 रु.