कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी बंधूंच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सुरू केलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरला 25 हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
बाजार समितीमधील मारुती देवालय परिसरामध्ये नुकताच देणगीचा धनादेश देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध व्यापारी सुरेश जाधव, विनायक होनगेकर यांच्या हस्ते युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह व्यापारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी अडत व्यापारी विश्वासराव घोरपडे यांनी 5000 रुपयांची देणगी दिली.