चालू महिन्यात मागणी 40 टक्क्मयांनी कमी होण्याचा अंदाज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आगामी काही दिवस लॉकडाउन वाढण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या कालावधीत मात्र इंधनाची मागणी मोठय़ा प्रमाणात घटली आहे. मार्चमध्ये या मागणीत 20 टक्क्मयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. हाच अंदाज पुढे करुन चालू महिन्यातही ही मागणी जवळपास 40 टक्क्मयांनी कमी होण्याचे संकेत व्यक्त करण्यात येत आहेत.
या सर्वाचा इंधनाच्या किमतीवर मोठा प्रभाव पडत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. इंडिया रेटिंग्सच्या माहितीनुसार मार्च महिन्यात इंधनाची मागणी 20 टक्क्मयांनी कमी झाली. परंतु क्षमतेनुसार वापर 50 टक्क्मयांपर्यंत कमी झाला. याचा फटका नफा कमाईसोबत रिफायनरीच्या ठराविक पातळीला बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लॉकडाउनमुळे जवळपास सर्वत्र व्यवहार ठप्प झालेत. देशात 16 मार्चपासून ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केलेला नाही. या काळात कच्च्या तेलाचे दर मात्र नीचांकी पातळीवर आलेत. त्यानंतरही इंधनाचे दर आहे तेच आहेत. एलपीजीच्या दरात बदल करण्यात आला आहे. करात वाढ केल्याच्या कारणामुळे काही राज्यांच्या पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत पुढेही घट राहिल असा अंदाज आहे.