1.2 टक्क्मयांनी घसरले
नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये बँकांकडून कर्ज वितरणामध्ये 1.2 टक्क्मयांची घसरण झाली आहे. कर्ज वितरणांमधील ही घसरण प्रामुख्याने शेती, इंडस्ट्री, सर्व्हीस आणि रिटेलसोबत अन्य क्षेत्रांमधील नोंद 33 शेडय़ूल्ड कमर्शिअल बँकांच्याकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. याचाच आधार घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक अहवाल सादर केला आहे. एप्रिल 2020 मध्ये ग्रॉस बँक पेडिट यांनी एकूण कर्ज वितरण 91.53 लाख कोटी रुपयाचे केले आहे. तसेच मार्च 2020 मध्ये एकूण कर्ज वितरण 92.63 लाख कोटीवर राहिले असल्याची माहिती आरबीआयच्या माहितीमधून उघड झाली आहे. इंडस्ट्रीज संदर्भात चर्चा करताना या अहवालात लार्ज, मिडीयम, स्मॉल आणि मायक्रो युनिट्सला देण्यात येणाऱया कर्जाच्या प्रमाणात मात्र 0.7 टक्क्मयांनी घसरण झाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच युनिट्सना 28.84 लाख कोटी रुपयाचे कर्ज दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बँकर्सच्या माहितीनुसार नवीन आर्थिक वर्षातील पहिल्याच महिन्यात कर्ज वितरणास मोठी वेग असतो परंतु कोविड19 च्या प्रभावामुळे ही मागणी मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे म्हटले आहे. तसेच मे महिन्यात काही प्रमाणात उद्योगक्षेत्र सुरु करण्यात आल्यामुळे ही मागणी वाढण्याचे संकेत असल्याचेही यावेळी नमूद केले आहे. वार्षिक आधारावर एप्रिलमध्ये वाटप करण्यात आलेल्या कर्ज वितरणाचा वेग हा 7.4 टक्के राहिला आहे.