येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील एप टेक्सी सेवा खंडीत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर गोवा पर्यटक टेक्सी चालक संघटणेच्या शि÷मंडळाला दिलेले आहे, तथापि या आश्वासनाची योग्य वेळेत पुर्तता न झाल्यास तमाम स्थानिक टेक्सी चालकांसहित रस्त्यावर उतरण्याचा गंभीर इशारा उत्तर गोवा पर्यटक टेक्सी चालक तसेच मालक संघटणेकडून सरकारला देण्यात आला आहे. उत्तर गोवा पर्यटक टेक्सी चालक संघटणेचे कार्यवाहक योगेश गोवेकर यांनी ही माहिती गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. उत्तर गोवा टुरिस्ट टेक्सी चालक तसेच मालक संघटणेच्या समितीकडून बार्देशातील वागातोर किनाऱयावर घेण्यात आलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत योगेश गोवेकर यांनी सरकारला हा इशारा देतांनाच पुढील परिणामांना तयार राहाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गोवा ही गोमंतकीय जनतेची हक्काची भुमी आहे येथील पवित्र भुमीत धंदा व्यवसाय करण्याचा सर्वप्रथम हक्क हा गोमंतकीय जनतेचा आहे. पर्यटनाच्या नावाखाली कुणीतरी परप्रांतीय सोम्या गोम्या याभागात माकडचेष्टा करत असेल तर ती प्रुती स्थानिक टेक्सीचालक ( भुमीपुत्र ) कदापी सहन करणार नसल्याचे गोवेकर यांनी यावेळी सांगितले. पोटाची खळगी भरण्यासाठी गोव्यात आलेल्या परप्रांतीय टेक्सी चालकांना गोव्याचा इतिहास आणी भुगोल तसेच वर्तमानाची काडीचीही माहीत नाही, अशा अज्ञात लोकांना आपल्या परदेशी पाहुण्यांची ने- आण करण्याची जबाबदारी सरकारकडून कशी काय दिली जाते असा सकारात्मक प्रश्न गोवेकर यांनी विचारला. गाडीतच रात्र निभावणारे परप्रांतीय टेक्सी चालक गोव्यात नकोच असा पवित्रा उत्तर गोवा टेक्सी चालकांनी घेतला आहे. दरम्यान, संघटणेचे अन्य एक पदाधिकारी संजय पुर्खे यांनी गोव्यात यापुढे कुठल्याही प्रकारची ऑनलाईन एप सेवा नकोच असे निक्षून सांगितले. सरकारशी याबाबतीत बोलणी झालेली आहे त्यांचप्रमाणे स्थानिक टेक्सी चालकांच्या समस्यां मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आलेल्या आहेत, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्थानिक टेक्सीचालक आणी मालक गोवाभर तीव्र आंदोलन छेडणार असून भविष्यात निर्माण होणाऱया परिणामांना खुद्द सरकार जबाबदार राहाणार असल्याचे पुर्खे यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, गोवा रिव्ह?लनरी कार्यकर्त्यांनी स्थानिक टेक्सी चालकांच्या प्रश्नात लक्ष घातले असल्याने भाजपा सरकारसमोर पळता भुईं कमी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे स्था?निकांत बोलले जात आहे.
Previous Articleरिलायन्सची व्हॉट्सऍपसोबत योजना
Next Article 24 जानेवारी रोजी वरुण धवन विवाहाच्या बेडीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.