वार्ताहर/ बेडकिहाळ
2020 चा वर्ष हा शेतकऱयांसाठी कर्दनकाळ ठरला असून चालूवषी निसर्गाच्या विकोपाने व कोरोनासारख्या महामारीने शेतकरी पूर्ण पणे भरडला गेला असून येत्या काही दिवसात साखर कारखाने प्रारंभ होत आहेत. पण बऱयाच कारखानदारांनी गतवषी आयुक्तांच्या बैठकीत ठरले असतानाही एफआरपीअधिक 200 रुपये प्रमाणे मिळणारा दर देण्यामध्ये शेतकऱयांची पूर्णपणे फसवणूक केली गेली आहे. तेव्हा आम्ही आमच्या घामाचा दाम वसूल केल्याशिवाय राहणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्नाटक संपर्क प्रमुख आदिनाथ हेमगिरे यांनी दिली.
बेडकिहाळ येथील शेतकरी संघटनेचे खंबीर कार्यक्रते प्रकाश तारदाळे यांच्या जय जिनेंद्र फार्म हाऊसवर आयोजित चिकोडी-निपाणी तालुक्यातील संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौगले होते. स्वागत व प्रास्ताविक बेळगाव जिल्हा कोरकमीटीचे सदस्य रमेश पाटील या?नी केले.
यावेळी आदिनाथ हेमांगिरे पुढे बोलताना 2 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमशीग मैदानावर होत असलेल्या 19 वी ऊस परिषद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून ही परिषद कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईनद्वारे दुपारी ? वाजता घेण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व शेतकरी व संघटनेचे कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या गावात घेण्यात यावा. कर्नाटकमधील काही कारखान्याने रिकव्हरी असतानाही एफआरपीप्रमाणे देण्यात येणारी रक्कम अधिक 200 रुपये आजवर दिली नाहीत. तर त्वरित शेतकऱयांच्या खात्यावर येणे असलेली ही रक्कम जमा करावी, अन्यथा धुरांडी पेटवू देणारा नाही, असा इशारा दिला.
यावेळी रमेश पाटील बोलताना म्हणाले, कर्नाटक सीमाभाग परिसरातील काही कारखानदारांनी एफआरपी प्रमाणे दर देतो देतो म्हणत शेतकऱयांची फसवणूक करत आहेत. कारखानदार आपली सोय पाहत आहेत. पण खऱयाअर्थाने शेतकऱयांची सोय कोण पाहणार?, हा प्रश्न शेतकऱयाला पडला आहे.
याबैठकीस निपाणी तालुका अध्यक्ष एन. आय. खोत, अनिल संकपाळ, अभय पाटील, संताजी नलवडे, बाबासाहेब कोकाटे, पंकज तिप्पणावर, तात्यासाहेब केस्ते, राजू पाटील, राजू उपाध्ये, सुभाष मूर्तले यांच्यासह निपाणी चिकोडी, शिरोळ तालुक्मयातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रकाश तारदाळे यांनी मानले. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 19 वी ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी घोषणाबाजी दिली.