क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
अंतिम सामन्यात शैलेंद्र कुडाळकरच्या एफसीएनयू ऍम्परर्स संघाचा पराभव करून ब्रिजेश प्रभूच्या एफसीएनयू रूलर्स संघाने तीन संघांतील टी-20 एफसीएनयू (फातोर्डा क्रिकेट नेट्स युनायटेड) चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचे आयोजन हुबळीत कर्नाटक जिमखानाच्या मैदानावर झाले. या स्पर्धेत चिराग नाईकचा एफसीएनयू किंग्स हा तिसरा संघ होता.
स्पर्धेत 88 धावा करणाऱया रोहित मेहताची स्पर्धावीर, 92 धावा करणाऱया उदय नाईकला तर पाच गडी बाद करणाऱया गौरव बोरकरची उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कारासाठी निवड झाली. या स्पर्धेत सामनावीर पुरस्कार योगेश नाईक, गौरव बोरकर, रोहित मेहता आणि चैतन्य कामत यांना मिळाले.
या स्पर्धेत अमर देविदास, अमित कामत, अमोध बोरकर, आनंद मिश्रा, अनुप बोरकर, ब्रिजेश प्रभू, सी. अशोक, चैतन्य कामत, चिराग नाईक, दिपक लोटलीकर, गौरव बोरकर, गुरुदत्त आंगले, जगन्नाथ सांबारी, नीलम कोरगावकर, प्रशांत आमोणकर, रघू कुंकळय़ेंकर, राजेश काकोडकर, रोहित मेहता, रौनक कामत, संतोष लोटलीकर, शैलेश रेडकर, शैलू कुडाळकर, श्रीराम शिमोगा, सुदेश नागवेकर, सुदेश प्रभुदेसाई, सनी लुत्रा, उदय नाईक, विनोद धामस्कर, विनोद सोळंकी, विश्वेश कामत, विश्वेश कारे आणि योगेश नाईक यांचा सहभाग होता.
स्पर्धेचे उद्घाटन हुबळी धारवाड महानगरपालिकेचे मेयर आणि कर्नाटक जिमखानाचे सचिव विरांगणा सावदी यांच्या हस्ते झाले. यावेळी गोव्याचे माजी रणजीपटू प्रमोद कामत उपस्थित होते. बक्षीस वितरण लायन्स क्लब हुबळीचे अध्यक्ष अभिषेक कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.