मडगाव : दोन वेळच्या आयएसएल विजेत्या चेन्नईन एफसीने स्पेनचा मध्यरक्षक मान्यूएल लांझारोत याच्याशी करार केला आहे. मोसमाच्या मध्यावर तो राफायल क्रिव्हेलारो याची जागा घेईल. एफसी गोवा आणि एटीकेचा माजी मध्यरक्षक असलेला 36 वर्षीय क्रिव्हेलारो तातडीने गोव्यात येणार असून आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर संघात दाखल होणार आहे.
आयएसएल फुटबॉल स्पर्धा दोनवेळा जिंकलेल्या संघाचा भाग होण्याची संधी मिळाल्याने आनंद होते असल्याचे लांझारोत म्हणाला. 2017-18 फुटबॉल मोसमात एफसी गोवा संघाकडून खेळताना त्याने 13 गोल व 6 असिस्ट अशी कामगिरी केली होती. पुढील मोसमात लांझारोतने एटीकेकडून खेळताना 5 गोल व दोन असिस्ट असे प्रदर्शन केले होते. 2019-20 मोसमात त्याने स्पेनची वाट धरताना सेगुंदा बीमधील सीई साबादेल क्लबकडून नशीब आजमावताना 22 सामन्यांत 4 गोल नोंदविले होते.