बेंगळूर/प्रतिनिधी
मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या कॅम्पसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ५९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर उडुपी जिल्हा प्रशासनाने त्यास कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
“११ मार्चपासून एमआयटी कॅम्पसमध्ये नोंदवलेल्या११४२ प्रकरणांपैकी ५९सकारात्मक निकाल फक्त सोमवार आणि मंगळवारी प्राप्त झाले. कॅम्पसमध्ये राहणारे अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतरांची चाचणी केली जाणार आहे. केवळ प्राध्यापक आणि आवश्यक कर्मचार्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाईल. निवासी विद्यार्थ्यांच्या हालचालींवरही बंदी घालण्यात आली आहे, ”असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे.