सातारा / प्रतिनिधी :
सातारा एमआयडीसीमध्ये एस.के. इंजिनिअरींग या कंपनीतून कास्टिंगसाठी आणलेले 1 लाख 77 हजार 360 रुपयांचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी जावेद मौला शेख (वय 23, रा. अहिरे कॉलनी देगाव फाटा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अद्याप अटक करण्यात आली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, समीर बबन मोकाशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार दि.16 जून 2021 च्या पूर्वी एस.के.इंजिनिअरींग एमआयडीसी सातारा व दिशा इंजिनिअरींग वर्क शिरवळ येथून परांपजे कंपनी ऍटो लि. सातारा व शिरवळ येथील कंपनीतील कास्टींगचे प्रोसेस करण्यासाठी दिलेला 1743 किलो वजनाचे 1 लाख 77 हजार 360 रुपयांचे साहित्य जावेद शेख याने चोरुन नेले. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार जाधव हे तपास करत आहेत.