बेंगळूर
टायर क्षेत्रातील अग्रेसर कंपनी एमआरएफच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱया तिमाहीत निव्वळ नफ्यात 53 टक्के इतकी घट झाली असल्याची बाब समोर आली आहे. कंपनीने 30 सप्टेंबर 2021 संपलेल्या तिमाहीत 189 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर मागच्या आर्थिक वर्षात समान अवधीत कंपनीने 410 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. कंपनीने सदरच्या कालावधीत 4 हजार 907 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे, जो मागच्या वर्षी समान अवधीत 4 हजार 244 कोटी रुपये इतका होता.