कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री येथे प्रशिक्षण घेणारा जवान बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अंकित तिवारी (वय 19) असे त्या जवानाचे नाव आहे.
तो दि. 22 रोजी कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे. त्याची उंची 171 सें.मी. आहे तर तो रंगाने गहूवर्णीय आहे. लांब नाक, गोल चेहरा, डोक्मयावर लहान केस असून तो हिंदी भाषा बोलतो.
तरी सदर जवानाविषयी कोणालाही माहिती मिळाल्यास कॅम्प पोलीस स्थानकाच्या 0831-2405234 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.