ऑनलाइन टीम / पुणे :
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड लेडीज क्लबतर्फे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचा १५ वा वर्धापनदिन विशेष, दृष्टिहीन व गरजू मुलांसमवेत साजरा करण्यात आला. मुलांना यावेळी शालेय साहित्य, भेटवस्तू, खेळणी, मिठाई खाऊ यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवणे येथील श्री साई सेवा मेंटली रिटार्डेड स्कूल अॅण्ड रिसर्च सेंटर व जिव्हाळा गर्ल्स हॉस्टेल वेद वासुदेव प्रतिष्ठान स्कूल फॉर ब्लाईंड चिल्ड्रन या संस्थांमधील मुलांना ही मदत व भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी सुश्मिता हलदर, रेणुका नायर, कविता सदाफुले, लेखा नायर, सुनीता सोनटक्के, निकीता सरदेसाई, वैशाली घुगे, अंजली गांधी, अदिती पत्की उपस्थित होते.