वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनची कार निर्मिती कंपनी एमजी मोटर आपली लक्झरी एसयूव्ही प्रकारातील एमजी ग्लोस्टर ही कार लवकरच भारतीय बाजारात दाखल करण्याचे संकेत आहेत. आतापर्यंत या कारची चाचणी असल्याचे अनेकांनी पाहिले आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये या गाडीची उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता कंपनीने या कारचा एक व्हीडीओ सादर केलेला आहे.
सदरच्या सादरीकरणावेळी कंपनीने दावा केला आहे की, पहिली ऑटोनॉमस (पातळी 1) प्रिमियम एसयूव्ही आहे. यामध्ये ऑटो पार्क असिस्टचे फिचर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी सदरची कार ही येत्या दिवाळीच्या जवळपास बाजारात उतरवली जाण्याची शक्मयता व्यक्त केली आहे.
कंपनीचा नेहमीच वेगळय़ा स्वरुपाचे नाव देण्याचा प्रयत्न असतो. ग्लोस्टर हे कारला नाव देत एमजी मोटर ब्रिटीश आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे.