वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एमजी मोटर्सने आपली नवी बहुप्रतिक्षीत सुव्ह गटातील ‘ग्लोस्टर’ भारतीय बाजारात उतरवली आहे. या गाडीची सुरूवातीची किंमत 28 लाख रुपये असणार आहे.
वरच्या गटातील ग्लोस्टरची किंमत 35 लाखापर्यंत असणार आहे. या किंमती सुरूवातीच्या 2 हजार ग्राहकांकरीता असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यानंतर कंपनीकडून गाडय़ांच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात. नव्या दमदार ग्लोस्टरला प्री-बुकिंगलाच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. आजवर 500 हून जणांनी या गाडीचे बुकिंग केले होते. या गाडीचे बुकिंग ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करता येणार असून ऑनलाइन बुकिंगकरीता एमजी मोटर इंडियाच्या संकेतस्थळाला ग्राहकांना भेट देता येईल. ऑफलाइन बुकिंग करता ग्राहकांना प्रत्यक्ष कंपनीच्या विक्रेत्यांकडे संपर्क साधता येतो. ग्लोस्टर गाडी बुकिंगकरता 1 लाख रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत.