नवी दिल्ली
आपल्याला मोठी कार बाळगायची इच्छा असेल तर हे स्वप्न आपल्याला आता साकार करता येणार आहे. एमजी मोटर्सच्या कार्स आपल्याला आता कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. सुव्ह गटातील कार्स बनवणारी कंपनी एमजी मोटर इंडिया भारतीय कार बाजारात सेकंड हँड कार्स विक्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रमाणीत जुन्या कार्स कंपनी विक्रीकरीता ग्राहकांना उपलब्ध करणार आहे. एमजी रिअश्युअर नावाने नवा व्यवसाय कंपनीने सुरू केलाय.