नवी दिल्ली
वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी एमजी मोटार इंडियाने जवळपास तीन वर्षांमध्ये देशात एकूण एक लाख वाहनाच्या विक्रीचा टप्पा पार केला असल्याची माहिती कंपनीने सोमवारी दिली आहे.
एमजी मोटारने जून 2019 मध्ये हेक्टर एसयूव्हीचे सादरीकरण करण्यासोबत भारतात आपल्या वाहन विक्रीची सुरुवात केली होती. सद्यकाळात कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही जेडएस ईव्ही, प्रीमियम एसयूव्ही ग्लोस्टर आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ऍस्टर या वाहनांचा समावेश आहे.
ही नवीन कामगिरी आगामी काळातही अशीच सुरू राहणार असून नवीन अनुभव ग्राहक सेवा आणि समुदायाच्या प्रती समर्पण करण्यावर लक्ष केंद्रीत करत हा प्रवास नव्या टप्प्यावर नेण्यात येणार असल्याचे एमजी मोटारने सांगितले आहे.
भारतीय वाहन क्षेत्रात सकारात्मक बदल
स्मार्ट मोबिलिटीने समाधानकारक बदल केला असून यामधून भारतीय वाहन क्षेत्रात सकारात्मक बदल करण्यात येणार असून मजबूत भविष्य निर्माण करण्यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू राहणार असल्याचे एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी स्पष्ट केले आहे.