नवी दिल्ली
एमजी मोटार इंडियाने लॉकडाऊनच्या काळातही काही प्रमाणात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने मे महिन्यात एकूण 710 कार्सची विक्री केली आहे. कंपनीने आपल्या हलोल येथील प्रकल्पात जवळपास 30 टक्के क्षमतेच्या जोरावर आपले उत्पादन पुन्हा सुरु ठेवले आहे. कंपनीने देशभरात जवळपास 65 शोरुम्स उघडली आहेत. संबंधीत ठिकाणी कार्यक्षमतेत वाढ करत कार्सची विक्री समाधानकारक केली आहे. लॉकडाऊनमुळे विक्री केंद्रे खुली केलेली नव्हती आता नियमावलीनुसार केंद्रे सुरू केली आहेत. पूणे, सुरत, कोच्ची, चंदीगड, जयपूर आणि चेन्नई या ठिकाणी कंपनीने विस्तार योजना आखली असल्याचे विक्री संचालक राकेश सिदान यांनी म्हटले आहे.