मुंबई : हेल्थकेअर आणि वेलनेस उत्पादनांचे वितरण करणारी कंपनी न्यूरेका लिमिटेडचा समभाग बीएसईमध्ये 59 टक्के प्रिमियमवर लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीने समभागाचे प्राईस ब्रँड 400 रुपये ठेवले होते, ज्यात एक्सचेंजवर 635 रुपये लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतर समभागात वाढ झाली आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओही येत्या 3 मार्च रोजी खुला होणार असल्याची माहिती आहे. कंपनी ज्याच्या आधारे 596.4 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत.
एमटीएआरची किमत निश्चित
हैदराबादमधील कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीने आयपीओ आणण्यासाठी जवळपास 574 ते 575 रुपये प्रति समभाग प्राईस बँड निश्चित केला आहे. यामध्ये 21.84 लाख नवीन समभाग सादर होण्याची शक्यता आहे आणि ऑफर फॉर सेलच्या आधारे प्रमोटर व गुंतवणूकदार 82.24 लाख समभाग सादर करणार आहेत.