: मराठा महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)मार्फत घेण्यात येणार्या सर्व परीक्षांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 38 वरून 43 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी मराठा महासंघातर्फे शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आयोगामार्फत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये वयोमर्यादा 38 ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 दिलेल्या निर्णयाद्वारे मराठा समाजासाठी पूर्वी राज्य सरकारने दिलेले आरक्षण रद्द केल्यामुळे समाजातील सर्व तरुणांची निराशा झाली आहे. त्याच वेळी शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते कि आरक्षण रद त्यामुळे ज्या ज्या सुविधांना मराठा समाजातील विद्या मुकावे लागणार आहे, त्या त्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करु. परंतु प्रत्यक्षात यातील काहीही झालेले नाही. या उलट परिक्षेसाठीच्या जाहिरातीतील निकष पाहता असे दिसून येते कि, मराठा समाजाला असणार्या सुविधाही सरकार हिरावून घेत आहे. महाराष्ट्रात मराठा समाज मोठÎा संख्येने असून तो मागासही आहे. तसेच मागास आहे. `एमपीएससी’साठी सर्व साधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 38 आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 ला दिलेल्या निर्णयापूर्वी मराठा समाजासाठी वयोमर्यादा 43 होती, परंतु आरक्षण रद्दच्या निर्णयाने ती 38 झाली. पावसाळी अधिवेशन सुरु होताच मंत्रीमंडळाने ठराव घेऊन मराठा समाजासाठी `एमपीएससी’ करीता वयोमर्यादा 43वर्षे करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. परंतु जाहिरातीमध्ये वयोमर्यादा 38 वर्षेच आहे. त्यामुळे सरकारने ही वयोमर्यादा वाढवून 43 वर्षे करावी.
शिष्टमंडळात शंकरराव शेळके, उत्तम जाधव, प्रकाश पाटील, अवधूत पाटील, प्रताप नाईक, महादेव पाटील, प्रतिकसिंह काटकर, राजू पराडेकर, इंद्रजीत माने, दिग्विजय काटकर आदींचा समावेश होता.