चेन्नई
डिजिटल ऍप्लीकेशन प्रणाली हाताळणी करणारी कंपनी एमपोकेट येणाऱया काळात 1500 जणांना रोजगार मिळवून देणार असल्याची माहिती आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये ही भरती केली जाणार आहे. एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत एमपोकेटने 500 कर्मचाऱयांना कंपनीत सामावून घेतले होते. सध्याला कंपनीत काम करणाऱयांची संख्या 1400 इतकी आहे. डाटा ऍनालिटीक्स, एचआरसह इतर विभागात भरती होणार आहे.