मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : मंत्र्यांसोबत काम करण्याची मिळणार संधी
प्रतिनिधी / पणजी
एमबीए तसेच अन्य क्षेत्रात पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरणाऱया मुख्यमंत्री पॅलोशीप योजनेचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याद्वारे 20 तरुणांना मंत्र्यांच्या कार्यालयात आणि विविध खात्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. ही एक शिष्यवृत्ती योजना असून त्यासाठी 10 हजार आणि 30 हजार अशा दोन श्रेणीत वेतन देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कला अकादमी दुरुस्तीसाठी 50 कोटी
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या अन्य महत्वाच्या निर्णयांत कला अकादमी इमारतीच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. इमारतीच्या मूळ ढाच्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. या वास्तुची कोणतीही तोडफोड न करता हे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याद्वारे नवी कला अकादमी साकारेलश, असे यावेळी बोलताना कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
काणकोण, सांगेतील घरांना वीज जोडणी
काणकोण, सांगे भागातील काही घरांना वीज जोडण्या देण्याचे काम अडले होते. त्यांना वीज जोडण्या देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, आजपासून सुरू होणाऱया विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी मंत्र्यांशी चर्चा करणे तसेच अन्य काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.