प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या कमी पडू लागल्याने सरकारने आता एमबीबीएस आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना कोविड-19 च्या सेवेसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने तशी सूचना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना केली आहे.
वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या संचालकांनी याबाबत आपल्या विद्यार्थ्यांना सूचना करावी, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा झाल्यानंतर त्वरित संचालकांना तशी माहिती द्यावी, असे आवाहनही सरकारने केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सर्व अधिकाऱयांना वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या, असे स्पष्ट सांगितले आहे. याबरोबरच लॅब टेक्निशियन म्हणजेच तंत्रज्ञ या शाखेच्या अभ्यास करणाऱया अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही कोरोनाच्या सेवेसाठी सामावून घ्या, अशी सूचना करण्यात आली आहे.