बेळगाव : डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीच्या ग्रंथालय विभागातर्फे नॅशनल प्रोग्रॅम ऑन
टेक्नॉलॉजी एनहॅन्सड् लर्निंग (एनपीटीईएल) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांनी या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली व नूतन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख वक्ते एनपीटीईएल आयआयटी मद्रासचे डॉ. भारत बालाजी, डॉ. वैशाली बहल यांनी अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. सदर अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तांत्रिक मंडळाच्या सूचनेवरून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ऑनलाईन कार्यशाळेत भारतातील विविध महाविद्यालयांतील एक हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. डीन डॉ. प्रवीण घोरपडे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. प्रमुख ग्रंथपाल डॉ. सतीश तोटर यांनी सूत्रसंचालन केले.
Previous Article1 जुलैपासून शाळा होणार सुरू
Next Article आराधना शाळेत लसीकरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.