आर्थिक व्यवहारात केली होती मध्यस्थी, पाच जणांना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
दोघा जणांच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्थी करणाऱया एम. के. हुबळी येथील एका धाबा मालकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून कित्तूर पोलीस स्थानकात आठहून अधिक जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. फूल विक्री व्यवसायातील 1500 रुपयांच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केल्याने धाबा मालकाचा खून करण्यात आला.
प्रकाश बसवराज नागनूर (वय 35, मूळचा रा. बैलहोंगल, सध्या रा. एम. के. हुबळी) असे त्याचे नाव आहे. प्रकाश हा पंचवटी धाब्याचा मालक होता. आठहून अधिक जणांच्या एका टोळक्मयाने त्यांना मारहाण करून त्याचा खून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी व त्यांच्या सहकाऱयांनी एम. के. हुबळीला भेट देऊन पाहणी केली. तसेच पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुलअजीज महम्मदअली बडेगार, महंमदशफी उर्फ सद्दाम रफीकअहमद बडेगार, शकीलअहमद रफीकअहमद बडेगार, इरफान मोदीनशा बडेगार, साजिद शब्बीरअहमद बडेगार (सर्व रा. एम. के. हुबळी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली.
बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी, कित्तूरचे मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ कुसगल, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. माविनकट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. बिलाल बडेगार, सर्फराज बडेगार, शाहबाज बडेगार हे तिघे अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुलअजीज बडेगार हा बैलहोंगल येथील मंजुनाथ शंकऱयाप्पा शिंत्री यांचे 1500 रुपये देणार होता. फुलविक्री व्यवहारातून ही रक्मकम द्यायची होती. रविवारी सकाळी धाब्यावर बोलणी सुरू होती. त्यावेळी धाबा मालक प्रकाश नागनूर याने मध्यस्थी केली व अब्दुलअजीजला मंजुनाथचे पैसे देण्यास सांगितले. हाच राग मनात ठेवून सायंकाळी अब्दुलअजीजने एका टोळक्मयाला धाब्यावर आणून धाबा मालकासोबत भांडण काढले. भांडणातून हा प्रकार घडला आहे.
धाब्यावर राडा अब्दुलअजीज व मंजुनाथ यांच्यातील आर्थिक व्यवहारातून पंचवटी धाब्यावर राडा झाला. रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास टोळक्मयाने धाबा मालकाला मारहाण केली. रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलला नेताना त्याचा मृत्यू झाला. धाब्याचे मॅनेजर उमेश गंगाप्पण्णावर (रा. बैलहोंगल) यांनी कित्तूर पोलीस स्थानकात मध्यरात्री फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 143, 147, 323, 324, 504, 302 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.