वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
माकप नेते आणि केरळ विधानसभेचे माजी अध्यक्ष एम.बी. राजेश यांनी राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एम.व्ही. गोविंदन यांच्या जागी त्यांना मंत्रिमंडळात सामील करण्यात आले आहे. गोविंदन यांनी माकपचे राज्य सचिव म्हणून नियुक्ती मिळाल्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी 51 वर्षीय राजेश यांना राजभवनात मंगळवारी पद अन् गोपनीयतेची शपथ दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन उपस्थित होते. लोकसभा सदस्य राहिलेले राजेश हे पलक्कडमधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. थालास्सेरीचे आमदार ए.इन. शमशीर हे आता विधानसभा अध्यक्ष