मुंबई
विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार असून याची तयारी वेगाने करण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत आयपीओच्या परवानगीकरीता एलआयसीने आपला अर्ज पुढच्या महिन्यात दाखल करण्याचे निश्चित केले आहे. एलआयसी आपला आयपीओसाठीचा रितसर अर्ज भारतीय भांडवली बाजारातील नियामक सेबीकडे दाखल करणार आहे.याच चालू आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ बाजारात लाँच होणार आहे.