नव्या विमा हप्त्यात दिसली वाढ , खासगी कंपन्याही तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये नवीन व्यवसायातून चांगली कामगिरी करता आली आहे. या वर्षाच्या दरम्यान सार्वजनिक क्षेत्रात कंपनीने या अगोदरच्या वर्षात नवीन विमा हप्त्यांमधून आपला व्यवसाय 25.2 टक्क्मयांनी वाढविला आहे तर खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी याच व्यवसायात एकूण मिळून 11.64 टक्क्मयांनी वाढ दर्शवली आहे.
आर्थिक वर्षात मार्च महिन्याच्या शेवटचे पंधरा दिवस विमा कंपन्यांसाठी व्यवसायासाठी महत्त्वाचे असतात. परंतु मागील आर्थिक वर्षात हा पंधरवडा कोविड 19 च्या संकटामुळे व लॉकडाऊनच्या प्रभावामुळे शांत असल्याचे पहावयास मिळाले आहे. यातच एलआयसीने नवीन विमा पॉलीसीमधून पहिल्या वर्षातील हप्त्यांमधून मिळणारी रक्कम 25.2 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती दिली आहे. या कामगिरीमुळे एलआयसीची व्यवसायातील हिस्सेदारीही वाढली आहे.
पॉलीसीच्या संख्येच्या हिशोबात बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी 1.19 टक्क्मयांनी वधारुन 75.90 टक्क्मयांवर स्थिरावली आहे. या अगोदरच्या वर्षात हप्त्यांची रक्कम ही त्यांच्या हिस्सेदारीच्या तुलनेत 2.50 टक्क्मयांनी वधारुन 68.74 टक्क्मयांच्या घरात पोहोचली आहे.
समाधानकारक कामगिरी
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एलआयसीने पॉलीसी विक्रीतून समाधानकारक कामगिरी केली असून या कालावधीत 2.19 कोटीच्या विमा पॉलीसी विकल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती एलआयसीकडून देण्यात आली आहे. मागील सहा वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक पॉलीसी करण्याचा विक्रम असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.