मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे समभाग शुक्रवारी 13 टक्के इतके शेअर बाजारात वाढल्याचे दिसले. कंपनीचा डिसेंबर 2021 अखेर संपलेल्या तिमाहीत कर पश्चात नफा 6 टक्के इतका वाढला आहे. बीएसई सेन्सेक्सवर कंपनीचे समभाग 12 टक्के वाढून भाव 389 रुपयांवर आला होता. निफ्टी निर्देशांकावरही समभाग 12 टक्के वाढीसह 389 रुपयांवर व्यवहार करत होता.