नवी दिल्ली
विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीने डिसेंबरला संपलेल्या तिसऱया तिमाहीत 234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती दिली आहे. आयपीओ सादरीकरणाआधी कंपनीने आपला तिमाही नफ्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 कालावधीत 1 हजार 642 कोटी रुपये नफा एलआयसीने कमावला आहे. आता एलआयसीचे लक्ष आपला आयपीओ आणण्यावर अधिक असणार आहे.