मुंबई
देशातील सर्वात मोठा आयपीओ सादर करण्यासाठी इच्छुक असणाऱया भारतीय जीवन विमा निगमने सीएफओंच्या नियुक्तीसाठी प्रयत्न चालवले असल्याचे सांगितले जाते. एलआयसीचा सर्वात मोठा आयपीओ यावर्षी भारतीय भांडवली बाजारात सादर व्हायचा आहे. त्याकरीता कंपनीने तयारी चालवली असून याचाच एक भाग म्हणून कंपनी येत्या मार्चपर्यंत सीएफओ (चिफ फायनॅन्शीयल ऑफिसर) नेमणार आहे.