बेळगाव / प्रतिनिधी
एलआयसी ऑफ इंडियाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी समवेत व्यवसाय सामंजस्य कराराचे नुतनीकरण केले. एलआयसीचे वरि÷ विभागीय व्यवस्थापक ए. डी. वारकरी व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी करारपत्रावर स्वाक्षऱया केल्या.
लोकमान्य सोसायटी 2017 पासून एलआयसीची कार्पोरेट सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे. लोकमान्यने पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या पॉलिसीची विक्री केली आहे. लोकमान्य सोसायटीच्या 2013 शाखांमधून एलआयसीच्या सर्व विमा पॉलिसींची विक्री व जाहिरात केली जाते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहे.
यावेळी बोलताना एलआयसीचे वरि÷ विभागीय व्यवस्थापक ए. डी. वारकरी यांनी लोकमान्यच्या यावषीच्या योगदानाबद्दल कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लोकमान्यने आतापर्यंत 511 पॉलिसी विक्री केल्या आहेत. यातून 4.76 कोटी रुपयांचा वार्षिक हप्ता भरला जातो. यामुळे बेळगाव विभागात लोकमान्यने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बेळगाव विभागात बेळगाव, विजापूर व बागलकोट या जिल्हय़ांचा समावेश होतो. तसेच दक्षिण मध्य विभागात दहावा क्रमांक मिळविला आहे. दक्षिण मध्य विभागात कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचा समावेश होतो.
लोकमान्यसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे ऑल इंडिया कार्पोरेट एजन्सी न्यू बिझनेसमध्ये संपूर्ण भारतात लोकमान्य सोसायटीचा सहावा क्रमांक आहे.
यावेळी बोलताना लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी एलआयसीचे आभार मानून भविष्यातही चांगल्या व्यवसायाची ग्वाही दिली. या करारपत्रावर एलआयसीचे मार्केटिंग व्यवस्थापक वाय. एम. मुराळ व लोकमान्यचे सीईओ अभिजित दीक्षित यांनीही स्वाक्षऱया केल्या. यावेळी प्रितम बिजलानी, लोकमान्य समुहातील व एलआयसीचे अधिकारी उपस्थित होते.